औरंगाबाद : विविध दैनिकात संपादक असताना कारकीर्द गाजवणारे वरिष्ठ पत्रकार सुंदर लाटपटे यांनी पुंडलिकनगर राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सुसाईडनोट च्या आधारावर पत्रकार संजय उन्हाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.लटपटे यांनी लोकमत, मराठवाडा, लोकपत्र,पुण्यनगरी,पुढारी अशा विविध दैनिकात पत्रकार संपादक या पदावर काम करीत आपला ठसा उमटवला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचे घरगुती वाद सुरू होता. त्यांच्यावर विविध बँकांचे कर्ज देखील होते अशी माहिती समोर येत आहे.
रोज सकाळीच झोपेतुन उठणारे आज सकाळी झोपेतून उठले नसल्याने नातेवाईकांनी डोकावून पाहिले असता त्यांनी गळफास लावल्याचे चित्र दिसले.ही बाब पोलिसांना कळविले नंतर पुंडलीकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला त्यावेळी खुर्चीवर उभेराहून नायलॉन वायर च्या साहाय्याने गळफास लावल्याचे समोर दिसून आले. पोलिसांनी मृतदेह फसावरन उतरवत घाटी रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठवला आहे. या आत्महत्या संर्दभात पुढील तपास सहाययक निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत.
सुसाईडनोट मध्ये नातेवाईकवर आरोप
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना खोलीत एक सुसाइड नोट सापडली आहे. त्या नोट मध्ये पत्रकार संजय उन्हाळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्या नोट मध्ये आहे.या प्रकरणी उन्हाळे विरोधात पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती. पोलिसांचा एक पथक उन्हाळे यांना पकडण्यासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.